Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mob Lynching : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा खा. असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून समाचार

Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या वादावर आज सकाळी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.  मॉब लिंचिंग आहे, आपल्याच देशात अस्तित्वात आहे. आत्तापर्यंत झालेल्या हिंसक घटना तुम्ही विसरलात का असा सवालही त्यांनी भागवतांना केला.

या देशात मॉब लिंचिंग नावाचा प्रकार नाहीये तो पाश्चिमात्य देशातला आहे असे  वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी  केले होते . ओवेसी म्हणाले, या देशात धर्मनिरपेक्षता राहिलेली नाही. सर्वत्र हिंसक वातावरण आहे. व्देष पसरविला जातोय. पहिले तुमच्या गोडसेंना आवरा असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, दिल्लीत लहान मुलाला ठेचून मारले  जाते, केवळ मुस्लिम असल्यामुळे मारले  गेलेले  तबरेज प्रकरण ताजे  आहे. असं असतानाही मोहन भागवत म्हणतात देशात मॉब लिंचिंग नाही,  हे चुकीचं आहे याच देशात गुजरात, प्रकरण, दिल्ली मधील शीखांच हत्याकांड हे कुठे घडलं याचं उत्तर भागवतांनी दिलं पाहिजे.

तुम्ही धर्मनिरपेक्षता वाचविण्याच्या भानगडीत पडू नका आधी समाजला फुटण्यापासून वाचवा असंही ते म्हणाले. देशात सगळीकडे नफरत पसरवली आहे याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे अशी टीकाही त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!