महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शपथपत्रांवर आक्षेप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे आशिष देशमुख हे मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. काँग्रेसच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. यावर सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतलं, ते ३ तारखेला घेण्यात आलं आहे. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्काही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेल्या नोटरीचा कार्यकाळ २०१८ पर्यंतच असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अर्जावरही आक्षेप
असाच आक्षेप भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अर्जावरही घेण्यात आला असून त्यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जही विचारार्थ ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरशे थोरात यांनी संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केलं, त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीवर लवकरच सुनावणी होणार आहे.
भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखेंच्या अर्जावर हरकत घेतली आहे. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे ३ असे एकुण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना २०१६ मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल झाली आहे. दरम्यान शिर्डीतील विधानसभा मतदारसंघासाठी विखे हे सर्वात अधिक मोठे दावेदार आहेत. अशावेळी त्यांच्याच उमेदवारी अर्जावर गंडांतर आल्यामुळे विखे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.