Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Updates : मुख्यमंत्र्यांना क्लिनचीट , अर्जावरचे आक्षेप फेटाळले, निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

Spread the love

निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरील आरोपांची शहानिशा करून अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळण्यात आले आहेत.  या निवडणुकीत  देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवारांनी काही मुद्द्यांच्या बाबतीत हरकत घेतली होती. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र हे नोटरी समक्ष सादर केले आहे. त्याची मुदत २८ डिसेंबर २०१८ रोजी संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच प्रतिज्ञापत्राच्या सीलवर २८ डिसेंबर २०१८ ही तारीख आहे. तर नोटरीच्या आडव्या शिक्क्यावर ३ ऑक्टोबर २०१० ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे शपथपत्र अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवून ते स्वीकारु नये अशी मागणी करण्यात आली.

याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी उपरोक्त नमूद पुरुषोत्तम मोरेश्वर सोनटक्के यांच्या व्यवसाय प्रमाण पत्राची प्रत आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी हरकत उपस्थित झाल्यावर केली आहे. सदर व्यवसाय प्रमाणपत्राला २९ डिसेंबर २०१८ पासून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे दिसून आले. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतदार आणि हरकतीत तथ्य नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!