अजित पवार यांच्या नावाने पैसे मागण्यासाठी ‘त्याने’ फोन केला पण समजले कि , पवारांचा मोबाईल झाला हॅक ….

सायबर क्राईम स्मार्ट फोनच्या काळात नित्याची बाब झाली आहे. बँकांच्या किंवा काही काही आर्थिक प्रलोभने दाखवून होणारी फसवणूकही आता नेहमीचीच झाली आहे. पडणाऱ्या लोकांचे बँक खाते साफ केले जाते तेंव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजते आणि लोक पोलिसांची मदत घेतात याचाच फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाही बसता बसता राहिला.
त्याचे असे झाले कि ,
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला. त्या फोनवर कुणाल नावाची व्यक्ती बोलत होती. ‘सध्या दादा पुण्यात आहेत. मात्र एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा,’ असा निरोप होता.
राणे यांनी लगेच होकार कळवला आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी १० मिनिटे वेळ मागितला. राणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अजित पवार यांचा असा फोन कधीच येऊ शकत नाही, असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन लावला तेव्हा अजित पवार पुण्यात असल्याचे कळले. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, काही वेळातच पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र अजित पवार यांनी ‘मी तुम्हाला फोन केलेलाच नाही, माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.
नंतर लक्षात आले कि , पवार यांचा फोन हॅक झाला आहे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमकडे यासंदर्भात तक्रार दिली असून फोनचे सर्व कॉल डिटेल्स दिले आहेत, असे समजते.