Aurangabad : भाकपकडून अॅड. अभय टाकसाळ यांची उमेदवारी दाखल

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व डाव्या लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अभय मनोहर टाकसाळ यांनी औरंगाबाद शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .
हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाकप चे राज्य सचिव कॉ तुकाराम भस्मे आले होते सोबतच कॉ राम बाहेती, कॉ माधुरी क्षीरसागर, कॉ भास्कर लहाने , कॉ मधुकर खिल्लारे , कॉ पंकज चव्हाण , कॉ सागर दुर्योधन, आदींची उपस्थिती होती.
या वेळी कॉ अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . ही यात्रा अण्णा भाऊ साठे चौक ते पैठण गेट अशा मार्गाने जल्लोषात घोषणा देत पैठणगेट येथे समाप्त झाली. यानंतर या यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले .आपल्या लढण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. या वेळी कॉ अश्फाक सलामी यांनी प्रास्तविक केले तर आपण निवडणुकीत का व कशासाठी उतरलो आहे हे तरुण तडफदार उमेदवार कॉ अभय टाकसाळ यांनी आपली भूमिका मांडली व आपले धोरणे काय असतील याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना, अभय टाकसाळ म्हणाले की, औरंगाबादचे मुख्य प्रश्न सोडवणे ही माझी जबाबदारी आहे ही भावना त्यांनी बोलून दाखवली तसेच मतदान करताना जात धर्म न पाहता ज्या उमेदवारांनी रस्त्यावर उतरून लढले आहेत अशेच लोक आपले प्रश्न मांडू शकतात असा विश्वास व्यक्त केला . यावेळी एम आय एम च्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला व अभय टाकसाळ यांना निवडूनच आणणार याची ग्वाही ही दिली . या नंतर कॉ किरण पंडित यांनी रोजंदारी कर्मचारी युनियन यांच्या तर्फे आपला पाठिंबा जाहीर केला. कॉ माधुरी क्षीरसागर यांनी महाराष्ट्र शासनावर कडकडीत प्रहार केला आणि जनतेला अपील केले की जातीच्या , धर्माच्या नावावर मत देऊ नका तर ज्याला विकासाची दृष्टी आहे अशा उमेदवारालाच निवडून आनुया यानंतर भाकप चे राज्य सचिव कॉ तुकाराम भस्मे यांनी केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढले आणि या आर्थिक मंदी बाबत सरकारला जबाबदार धरले , या मंदी मुळे शेतकरी , मजूर लहान उद्योजक याना कसा फटका बसला हे लक्षात आणून दिले तर मधुकर खिल्लारे यांनी या सभेचा समारोप केला .