Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : कोथरूडमध्ये लागले “नोटा -१०० टक्के ” चे बोर्ड , चंद्रकांत पाटलांसमोर मोठे आव्हान

Spread the love

कोथरूडमध्ये विद्यमान आमदार मेघा कुलकर्णी यांना डावलून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघातून व्यक्त होणारी नाराजी कमी होत नसल्याने चंद्रकांत पाटील  यांची डोकेदुखी वाढली आहे. आमदार मेघा कुलकर्णी यांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांना कडाडून विरोध केला आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी 100% नोटाला मतदान असे काळ्या रंगाचे पोस्टर्स झळकले आहे.

भाजपने विद्यमान १२  आमदारांचा पत्ता कट केला असून  त्या १२ आमदारांमध्ये कोथरुडच्या मेघा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने मनसेचे कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी याबाबत माहिती दिली.

थेट जनतेतून निवडून येण्याचे शरद पवारांनी दिलेले आव्हान चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वीकारलचे नाही तर यापुढे पुण्यावर आपलचे वर्चस्व राहील असेही सूचित केले त्यामुळे कोथरूडच्या विजय चंद्रकांत पाटील आणि भाजपसाठी प्रतिष्टेची लढत ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत चंद्रकांत पाटलांनी  कोथरुड विधानसभा मतदारसंघातून  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान या मतदार संघात बंडखोरी होणार असल्याचे चित्र होते परंतु भाजपने सर्व बंडोबांना थंड केले . तरीही या मतदारसंघात जातपात आणि स्थानिक-बाहेरचा असा वाद पेटला असल्याने भाजपाला विजयासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसेच पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांचे एकच उमेदवार असावा, यासाठीही प्रयत्न केला जात होता. आता राष्ट्रवादीने याबाबत भूमिका घेत आपला पाठिंबा मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर केला आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!