Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live News Updates : Maharashtra Vidhansabha 2019 : उमेदवारांची धावपळ , काँग्रेसची अंतिम यादी जाहीर

Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली आणखी एक उमेदवार यादी जाहीर करत ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी काँग्रेसने कुडाळ विधानसभा मतादारसंघातील उमेदवार बदलला आहे. काँग्रेसकडून राघोबा कुडाळकर यांच्या जागी चेतन मोंडकर यांना संधी देण्यात आली आहे.

नांदेड दक्षिण – मोहनराव माणिकराव हंबार्डे

मुखेड – भाऊसाहेब पाटील

नांदेड दक्षिण – मोहनराव माणिकराव हंबार्डे

मुखेड – भाऊसाहेब पाटील

पालघर (ST)- योगेश नाम

कुडाळ – चेतन मोंडकर

भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी

अहमदनगरमधून वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या १८ सभा होणार

नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसने ऐन वेळी बदलला उमेदवार; शाहू खैरे यांच्याऐवजी आता पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी जाहीर

शिवसेनेला जागा सुटल्यानं कळमुनरीत बंडखोरी; शिवाजी माने यांनी भरला अर्ज

हिंगोलीत भाजपमध्ये बंड; गजानन घुगे अपक्ष लढणार

सिंधुदुर्ग: कोकणात राजकारण तापणार; कणकवलीत शिवसेनेचा सतीश सावंत यांना पाठिंबा

संजय निरुपम म्हणतात अशाने पक्ष बरबाद होईल 

‘काँग्रेसमध्ये रचनात्मक बिघाड झाला आहे. केवळ माझ्याच नव्हे, खुद्द राहुल गांधी यांच्या विरोधातही कट रचला जात आहे. हे सगळं लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्ष बरबाद होईल,’ असा संतप्त इशारा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे.

घाटकोपरमध्ये प्रकाश मेहतांच्या कार्यकर्त्यांकडून पराग शहांच्या गाडीची तोडफोड

घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षामधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलासा; कामठी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना भाजपची उमेदवारी

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार; पत्नी मीनाताई भुजबळ यांनी केले औक्षण

खडसे यांच्या कन्येला तिकीट मिळाल्यानंतरही खडसे समर्थकांमध्ये नाराजी; खडसेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

नागपूरमधील संविधान चौकातून मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला सुरुवात

मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारे काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचंही शक्तिप्रदर्शन; संविधान चौकातून काढली रॅली

प्रकाश मेहतांना भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर घाटकोपरमध्ये राडे; अधिकृत उमेदवार पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड

नाशिक: भाजपला धक्का; बाळासाहेब सानप यांचा राजीनामा; राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!