Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजप लढवणार १५० जागा तर मित्र पक्षांना १४ जागांचे वाटप

Spread the love

‘युती’च्या घटक पक्षांना 18 जागा देण्यात येणार अशी चर्चा असतानाच घटक पक्षांची आता 14 जागांवर बोळवण होणार अशी आता चिन्हं आहेत. त्यामुळे भाजपच्या जागा 146 वरुन 150 होण्याची शक्यता आहे. तर फलटणच्या जागेवर रयत क्रांती आणि आरपीआय या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. ‘युती’तले घटकपक्ष हे सर्व भाजपचे मित्रपक्ष आहेत. या सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असा दबाव भाजपवर आणला होता. मात्र प्रत्येक जागेचं गणित भाजपने पडताळून पाहिल्याने  कुठल्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची ताकद आहे याचा अंदाज भाजपने घेतलाय. त्यामुळे मित्रपक्षांच्या दबावापेक्षा जिंकण्याची ताकद महत्त्वाची असल्याचा संदेशच भाजपने दिलाय.

अशा आहेत घटक पक्षांच्या जागा : आरपीआय: 1) मानखुर्द (मुंबई)  2) माळशिरस (सोलापूर), 3) भंडारा, 4) नायगाव (नांदेड),  5) पाथरी (परभणी), 6) एक जागा ठरायची आहे , शिवस्वराज्य पक्ष – :

1) वर्सोवा (मुंबई), 2) किनवट( नांदेड ), 3) चिखली ( बुलडाणा ), रयत क्रांती संघटना :  1)पंढरपूर (सोलापूर), 2) अक्कलकोट (सोलापूर), 3) फलटण (सातारा),  रासप : 1) जिंतूर (परभणी), 2) दौंड (पुणे)

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!