Aurangabad : खोडेगावात अवैध देशी दारूचे 12 बॉक्स जप्त

औरंगाबाद तालुक्यातील खोड़ेगाव गावातील रेणुकामंदिर जवळ खोड़ेगाव ते एकोडपचोड़ रोडवर आडगांव येथील राहणाऱ्या गणेश सोपनराव साळुंके याने स्वतः च्या कार क्र.MH16BY 4227 मध्ये देशी दारुचे 11बॉक्स मधून सुस्तीतित 383 बॉटल वाहतूक करताना मिळून आले. व राजू गितखाने रा.कचनेर ह्याने स्वत:च्या मो सा क्र.MH20 DK 8967 वर 1 बॉक्स देशी दारू भिंगरी सत्रा ची दारू सह गाडीसह एकूण 564480/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पो स्टे ला पोकॉ रामेश्वर चेळेकर नेमणूक Dy.S.P. कार्यालय यांनी कायदेशीर फिर्याद दिली.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटिल, अप्पर पोलीस अधिक्षक श्री गणेश गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी
डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री महेश आंधळे , सहा.फौ करंगले, पोहेका पुंगळे , प्रेम म्हस्के, भूषण देसाई , पोका अनिल जायभाये आदींनी केली आहे.