पैठणचे तहसीलदार १ लाखाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात, कुळाच्या जमीनीत मदत करण्यासाठी स्वीकारली लाच

तक्रारदार शेतक-याच्या कुळाच्या जमीनीचा वाद मिटवून त्या प्रकरणात मदत करण्यासाठी १ लाख रूपयांची लाच घेणा-या पैठणच्या तहसीलदारासह तिन जणांना अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रविवारी (दि.२९) गजाआड केले. तहसीलदारालाच १ लाख रूपयांची लाच घेतांना एसीबीने कारवाई केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. महेश नारायण सावंत (वय ४१, रा.औरंगाबाद) असे लाचखोर तहसीलदाराचे नाव असल्याचे एसीबीचे अधीक्षक अरविंद चावरीया यांनी सांगितले.
तक्रारदार शेतक-याची पैठण तालुक्यात १२ एकर शेती असून त्या जमिनीचा कुळावरून वाद सुरू असल्याने प्रकरण तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे न्यायप्रविष्ठ आहे. जमिनीचा वाद निकाली लावून निकाल तक्रारदार शेतक-याच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार महेश सावंत यांनी ३० लाख रूपयांची लाच देण्याची मागणी ९ सप्टेंबर रोजी केली होती. तसेच १ लाख रूपये टोकन अमाऊंट म्हणून अॅड. वैâलास लिपने व त्यांचा मदतनिस असलेल्या बद्रीनाथ भवर याच्याकडे देण्याचे सावंत यांनी तक्रारदार शेतक-यास सांगितले होते. तक्रारदार शेतकNयास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती.
अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट यांच्या पथकाने रविवारी दुपारी सापळा रचून १ लाख रूपयांची लाच घेतांना तहसीलदार महेश सावंत, अॅड. कैलास लिपणे, ब्रदीनाथ भंवर यांना अटक केली. अॅन्टी करप्शन विभागाने केलेल्या कारवाईची माहिती मिळताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली.