Aurangabad Crime : उद्योजक राजपूतची हत्या करणा-या पत्नीची रवानगी हर्सुल कारागृहात

औरंंंगाबाद : उद्योजक शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांच्या खून प्रकरणात आरोपी पत्नी पूजा शैलेंद्र राजपूत हिची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे-तांबडे यांनी गुरुवारी (दि.२६) दिले.
या प्रकरणी मृत शैलेंद्र यांचा मोठा भाऊ सुरेंद्र शिवसिंग राजपूत (वय ४६, रा. न्यू श्रेयनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शैलेंद्र व आरोपी पूजा शैलेंद्र राजपूत (वय ४०, रा. खिंवसरा पार्क, उल्कानगरी) यांच्यात १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री वाद झाला होता व त्यावेळी पूजाने घरातील चाकुने शैलेंद्र यांच्यावर गंभीर वार केला होता. यात शैलेंद्र यांचा मृत्यू झाला होता, अशा तक्रारीवरुन जवाहनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.