Aurangabad : रत्नाकर गुट्टेचा जामीन खंडपीठाने फेटाळला

औरंंंगाबाद : शेतक-यांच्या नावावर परस्पर ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्या प्रकरणात अटकेत असलेले गंगाखेड शुगर इंडस्ट्रिजचे संचालक रत्नाकर गुट्टे यांच्यासह कारखान्याचे शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, बच्चूसिंग पडवळ व अन्य एकाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी गुरुवारी (दि.२६) फेटाळला.
रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर परभणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. गुट्टे हे सध्या कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणात गिरीधर साळुंके यांच्या वतीने अॅड. प्रवीण बचाटे यांनी, गुट्टेच्या वतीने आर. एन. धोर्डे, इतर तिघांकडून अॅड. राजेंद्र देशमुख यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.