Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : परस्परांवर कुरघोडी, तरीही भाजप -सेनेला महायुतीची गोडी !! आज सेमी फायनल कि फायनल ? चर्चा रंगल्या…

Spread the love

सतत पाच वर्षे या ना त्या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करीत तर कधी थेट आरोप प्रत्यारोप करीत  सरकार चालविणाऱ्या भाजप-सेनेला लोकसभेप्रमाणेच युती केल्याशिवाय अन्य पर्याय नाही असे दिसत आहे. एकत्र लढल्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका भाजप सेनेला बसेल आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल असे वाटत असल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक युती करण्याच्या दृष्टीने पावले टाकली असली तरी भाजपचे जागा वाटपाचे सूत्र सेनेला मान्य  असेल कि नाही हे सांगता येत नाही. तरीही हि युती व्हावी हि सेना नेत्यांची मागणी आहे मात्र युती न करता भाजपने विधानसभेची निवडणूक एकत्र न लढत स्वबळावर लढावी असा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे किंबहुना त्यांची प्रत्येक मतदार संघात तशी तयारीही झाली आहे.

कालच्या रविवारी अमित शहा यांची भेट होईल , या भेटीत जागा वाटपाचे सूत्र फायनल होईल आणि नंतर साथ अमित शहा फडणवीस -ठाकरे यांना सोबत घेऊन युतीची घोषणा करतील असे वाटत होते परंतु अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना न भेटताच मुंबई सोडली. आणि नुसती सोडलीच नाही तर आगामी निवडणुकीत भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असेही सांगून टाकले त्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झली आहे.

दरम्यान नाशिकच्या भव्य-दिव्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे थेट आवाहन केले. विशेष म्हणजे मोदी आणि शहा यांनी आपल्या भाषणात सेनेचा कुठेही उल्लेख केला नव्हता, त्यामुळे हि गोष्ट सेनेच्या चांगलीच  जिव्हारी लागली. त्यावर टिप्पणी करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर उपहसात्मक टीका केली होती तर भाजपसोबत जाऊन आम्ही मोठी चूक केली असे वक्तव्य केले.

काल  झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र देवेंद्र फडणवीस पत्रकारांना उद्देशून तुमच्या इतकीच युती आम्हालाही काळजी आहे. थोडे थांबा दोन दिवसात युती होईल असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊन आउटपुट काय निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आमचं ठरलंय आमचं ठरलंय असं भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगत आहेत. मात्र उद्या अर्थात मंगळवारी भाजपा आणि शिवसेना यांची युती जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात आमची युती होणारच असं दोन्हीकडच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तरीही उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमकं काय जाहीर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. आता प्रश्न हा आहे की भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? झाली तर जागावाटप कसं होणार? मित्रपक्षांना किती जागा दिल्या जाणार? दोन्ही पक्षांच्या जागा समसमान असणार का? नेमकं काय काय घडणार याची उत्तरं उद्या होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत मिळू शकतात अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. आता ही निवडणूक रंगतदार होणार यात काहीही शंका नाही. मात्र युतीचं घोडं अडलंय ते पुढे गेल्याशिवाय जागावाटप होणार नाही. असं सगळं असल्याने संयुक्त पत्रकार परिषदेत काय जाहीर होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ज्या दिवशी विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी काही एक्झिट पोल्सनी युती झाल्यास महायुतीला 200+ जागा मिळतील असं भाकितही वर्तवलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत कुणीही युती होणार नाही असं भाष्य केलेलं नाही. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत युती होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर जागावाटपाचा फॉर्म्युलाही समजू शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!