निंदनीय : मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना, ७ वर्षीय चिमुरडीवर तीन नराधमांच्या ८ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार, पोलिसही झाले सुन्न !!

कल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी आणि अतिशय निंदनीय घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात ७ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ३ नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या ८ महिन्यांपासून हे कृत्य करत होते. कल्याण बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये पोक्सा कायद्यांतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना कल्याण सेशन कोर्टाने २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक तपासात हि धक्कादायक माहिती जेंव्हा समोर आली तेंव्हा पोलिसही सून्न झाले. पोलिसांनी सांगितले कि , पीडित चिमुरडीची शाळा सुटल्यानंतर तिचा ऑटो रिक्षा येण्यासाठी १५ मिनिंटांचा कालावधी लागत होता, हे लक्षात घेऊन हे तिन्हीही आरोपी पीडित बालिकेला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात येत नव्हता. या घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त करण्यात आहे.
दरम्यान पीडित चिमुरडी तिच्या चुलत बहीणीसोबत खेळत होती. खेळता खेळता पीडितेच्या वर्तवणुकीबाबत आजीला शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आजीने ही वेदनादायक बाब पीडितेच्या आई-वडिलांच्या कानावर घातली आणि त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तिन्ही नराधमांना तात्काळ अटक करून गजाआड केले आहे. विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४) आणि अजय दोहारे (३७) अशी आरोपींची नावे आहेत.