Aurangabad : खासगी कोचींग क्लासेसवर आयकर विभागाचे छापे, दोन क्लास चालकांच्या कार्यालयाची झाडा-झडती

औरंंंगाबाद : शहरातील दोन नामांकित कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाने मंगळवारी (दि.१७) रात्री छापेमारी केली. कोचिंग क्लास चालकाकडून जप्त केलेल्या कागदपत्रांची बुधवारी दिवसभर तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली. आयकर विभागाने सुरू केलेल्या छापेमारीमुळे कोचिंग क्लास चालकात एकच खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दोनपैकी एका कोचिंग क्लासचा संचालक हा सत्ताधारी पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकप्रतिनिधी आहे. तर दुस-या संस्थेचा मालकही एका राजकीय पक्षाच्या निकटचा मानला जातो. औरंगाबादेतील दोन्ही नामांकित शैक्षणिक संस्था असून या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री काही आयकर विभागाच्या अधिका-यांची दोन पथके शहरता दाखल झाली. या पथकांनी दोन्ही कोचिंग क्लासेसच्या कार्यालयावर छापेमारी करून विद्याथ्र्यांकडून घेण्यात येणारे शुल्क व आयकर विभागाकडे भरण्यात येणार कर यामध्ये तफावत असल्याच्या संशयावरून छापा मारला असल्याचे सुत्रांनी सांगितले. आयकर विभागाच्या अधिका-यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्ही नामांकीत कोचिंग क्लास चालकांच्या कार्यालयातून अनेक संशयास्पद आणि महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. बुधवारी दिवसभर कोचिंग क्लास चालकांच्या कार्यालयातून जप्त केलेल्य कागदपत्रांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू होते. आयकर विभागाच्या अधिका-यांनी जप्त केलेल्या कागदपत्रात नेमके काय आक्षेपार्ह सापडले याची माहिती सायंकाळी उशिरापय्रंत मिळू शकली नाही. या कारवाई बाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.