Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकल रेल्वेच्या विलंबामुळे मुंबईकर त्रस्त , घाटकोपर स्थानकावर रेटा-रेटी , कोणालाही दुखापत नाही

Spread the love

मुंबई आणि उपनगरात मंगळवारी रात्रीपासून चांगलाच पाऊस कोसळत असून  या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यातच आता रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना घरी पोहोचणं अवघड झालं आहे. या सगळ्या परिस्थितीत सकाळपासून ठप्प असणारी मध्ये रेल्वेची वाहतूक  तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. घोटकोपर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे सोडण्यात आली.

गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल पुन्हा चालू झाले. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. यंदाच्या पावसाळ्यात लोकल ठप्प होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. रेल्वेसह रस्ते वाहतूक देखील मंद झाली आहे . दरम्यान कल्याण आणि ठाण्यात राहणाऱ्या मुंबईकडे येण्याचे मार्गच बंद झाले होते. दरम्यान अडीच तासांनी सोडण्यात आलेल्या घाटकोपर-ठाणे दरम्यानच्या लोकलमध्ये स्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

अडीच तासांनी आलेल्या लोकलमध्ये चडण्यासाठी प्रवाशांची घाटकोपर स्थानकात चांगलीच रेटा रेटी  झाली. या रेटा रेटीचा चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असला तरी यात कोणालाचा दुखापत झाली नाही. दुसरीकडे मुसळधार पावसामुळं आणि ट्रॅकवर साचलेल्या पावसामुळं डोंबिवली रेल्वे स्थानकातून अजूनही मुंबईकडे जाणारी किंवा मुंबईहून येणारी रेल्वेसेवा उपलब्ध नाही आहे. दर एक तासाने ठाण्यासाठी एक विशेष लोकल रवाना करण्यात येत असून पुढे लोकल कधी सुरू होतील, याबाबत मात्र रेल्वेकडून कुठलीही उद्घोषणा नाही. त्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजी असून प्रवाशांची रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!