Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप सेनेची युती होईल कि नाही ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

Spread the love

भाजप सेनेची युती होईल कि नाही याची चर्चा सर्वत्र चालू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या प्रश्नाचे उत्तर देऊन हि चर्चा एका अर्थाने थांबवली आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असताना पत्रकारणनी या विषयावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केंव्हा होईल हे कुणाला कळणारही नाही, ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजप शिवसेना युती झाली हे माध्यमांना कळले नाही. युती होईल की नाही अशीच चर्चा त्यावेळीही होत होती आणि आम्ही अचानक युतीची घोषणा केली. त्याचीच पुनरावृत्ती याही वेळी होईल.

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते त्यांनी या विषयावर पहिल्यांदा भाष्य केले . काल मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने  बीड , जालना आणि औरंगाबाद  दौऱ्यावर होते. औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी भाजपला  जाहीरपणे आशीर्वाद मागताना हरिभाऊ नाना , अतुल सावे , डॉ . भागवत कराड , आमदार सतीश बंब यांची नवे घेऊन शेवटी स्वतःचे नाव घेतले तेंव्हा उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिला आणि सभा संपली. राज्यमंत्री अतुल सावे आणि किशनचंद  तनवाणी यांनी  या सभेची जय्यत तयारी केली होती.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बीड, जालना  जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेचं प्रचंड स्वागत झालं , पण  आपण विरोधकांच्या यात्रेची परिस्थिती निश्चितपणे बघू शकता. लोकांचा कोणताही प्रतिसाद राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या यात्रेला मिळत नाही. काँग्रेसला यात्रा देखील मंगल कार्यालयात सुरू करावी लागते. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा, तर सुप्रिया सुळे यांनी दुसरी संवाद यात्रा काढली. सत्तेत असताना जनतेशी संवाद ठेवला नाही अन्यथा त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशी संवाद केला जनतेशी नाही. त्यामुळे जनतेने त्यांना या परिस्थितीमध्ये आणलं आहे. त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश होतो आहे. आमच्या या यात्रेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेली विविध कामे जनतेपर्यंत आम्ही पोचवतो आहोत.

मराठवाडा आणि औरंगाबादसाठी सरकारने काय काय केले याचा पाढाही मुख्यमंत्र्यांनी वाचला अतुल सावे माझ्याकडे रस्त्याचा प्रश्न घेऊन आले तेंव्हा त्यांना १०० कोटी रुपये दिले आणि हेही सांगितले कि , तुम्ही ७५ टक्के रक्कम खर्च केल्याचे दाखवा मी तुम्हाला २०० कोटी रुपये केंद्राकडून मिळवून देतो . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत समृद्धपणे वाटचाल करतो आहे आणि जगात भारताचा सन्मान वाढतो आहे . आपल्या देशाकडे कोणाचीही नजर वाकडी करून पाहण्याची हिम्मत नाही असेही फडणवीस म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!