Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : ध्वजारोहणासाठी नेताजीच्या वेशभूषेत निघालेल्या ९ वर्षीय बालकाचा भरधाव कारच्या धडकेने मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे आज सकाळी ही घटना घडली. संभाजी ज्ञानेश्वर शिंदे असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. औरंगाबादमधील झाल्टा फाटा येथे आज सकाळी भरधाव कारखाली चिरडून संभाजी शिंदे या नऊ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

शाळेतील ध्वजवंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार होता. मात्र, शाळेकडे जात असतानाच त्याला मृत्यूनं गाठलं. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातामुळं नागरिक संतापले असून, रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळं झाल्टा फाटा ते केंब्रिज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्व वाहतूक बीड बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात आली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!