Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Supreme Court : अयोध्याप्रकरणी आठवड्यातील पाच दिवस होणार सुनावणी

Spread the love

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनीच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार केली जाणार आहे. या अगोदर सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षकाराच्यावतीने बाजू मांडताना अॅड.राजीव धवन यांनी याप्रकरणी आठड्यात पाच दिवस सुनावणी घेण्यास आक्षेप नोंदवला होता. मात्र, सुनावणी सुरूच ठेवण्यात आली.

आठवड्यातील पाच दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर, यावर मुस्लीम पक्षकाराच्यावतीने आक्षेप नोंदवण्यात आला व सांगण्यात आले की, जर अशाप्रकारे या सुनावणीत घाई केल्या गेली तर, ते यामध्ये आम्ही सहकार्य करू शकणार नाही.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने याप्रकरणी शुक्रवारी जेव्हा  सुनावणी सुरू केली तेव्हा, मुस्लीम पक्षकाराच्यावतीने अॅड. राजीव धवन यांनी यासंबधी आक्षेप नोंदवला होता.

शुक्रवार आणि सोमवारी नव्या आणि प्रलंबीत खटल्यात दाखल केल्या जाणाऱ्या अर्जांवर विचार केला जात असतो. मात्र, शुक्रवारी जेव्हा ‘राम लला विराजमान’च्या वतीने अॅड. के.परासन यांनी आपली अर्धवट चर्चा पुढे सुरू केली तेव्हा अॅड.धवन यांनी यावर हस्तक्षेप नोंदवला. त्यांनी म्हटले की, जर आठवड्याच्या सर्वच दिवशी याप्रकरणाची सुनावणी केली जाणार असेल तर न्यायालयाला सहकार्य करणे शक्य होणार नाही. अशाप्रकारे घाई केल्या जाऊ शकत नाही. यावर मुख्य न्यायाधींनी त्यांना, आम्ही आपल्या म्हण्याची नोंद घेतली असल्याचे सांगत पुढील सुनावणी सुरू ठेवली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!