Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तिहेरी तलाक : वॉरंटशिवाय अटक आणि ३ वर्षांसाठी थेट तुरुंगात रवानगी

Spread the love

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मुस्लिम महिलांना संरक्षक कवच मिळाले आहे. या विधेयकामुळे तात्काळ तीन तलाक देणाऱ्याची तीन वर्षांसाठी थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तलाक देणाऱ्यास जामीन न देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.  या विधेयकानुसार तीन तलाक म्हणजे तलाक-ए-बिद्दतला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. तसचे तीन तलाक देणं हा गुन्हा मानण्यात आला असून कोणत्याही वॉरंटशिवाय आरोपीला अटक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पीडित महिला किंवा तिच्या नातेवाईकांनी जरी तक्रार केली तरी ही तक्रार ग्राह्य मानली जाणार आहे. या कायद्यात जामिनाची तरतूद आहे. मात्र जोपर्यंत पीडित महिलेची बाजू ऐकून घेतली जात नाही, तोपर्यंत आरोपीला जामीन न देण्याची या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय पीडित महिलेने संमती दर्शवली तरच समझोत्यासाठी न्यायदंडाधिकारी परवानगी देऊ शकतात. या कायद्यानुसार पीडित महिला पोटगीची मागणी करू शकते.  त्याची रक्कम न्यायदंडाधिकारीच ठरवतील. शिवाय अल्पवयीन मुलांचा ताबा महिलेकडेच देण्याची तरतूदही यात करण्यात आली असून याचा निर्णय घेण्याचे अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!