Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ : बराक ओबामा नंतर आता मोदी, काय म्हणून सहभागी झाले मोदी जाणून घ्या …

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या मालिकेतील एका भागात झळकणार आहेत. आज या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. उत्तराखंडमधील जिम कोर्बेट अभयरण्यात मोदी साहस करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमातील आपल्या सहभागाबद्दल मोदी म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी मी उंच पर्वत आणि जंगलात निसर्गाच्या सानिध्यात राहिलो होतो. त्या काळातील अनुभवांनी माझ्या आयुष्यावर चिरकाळ प्रभाव टाकलेला आहे. मला जेव्हा निसर्गात राहण्याबाबत विचारले गेले, तेव्हा राजकारणापलीकडे जात पुन्हा एकदा निसर्गात जाण्यासाठी मी तयार झालो.”

मोदी पुढे म्हणाले की, “हा कार्यक्रम सादर करणे ही माझ्यासाठी संधी असल्याचे समजतो. भारतातील समृद्ध पर्यावरण जगासमोर आणण्यासाठी तसेच पर्यावरण आणि निसर्गाचे संवर्धन करणे जरुरी असल्याची संधी यातून मिळत आहे. जंगलात वेळ घालवणे, हा माझ्यासाठी कधीही चांगला अनुभव आहे. यावेळी तर माझ्यासोबत बेअर ग्रिल्ससुद्धा आहे.”

बेअर ग्रिल्स हा डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. बेअरनेच आज मोदी यांच्या एपिसोडचा ट्रेलर ट्विटरवर पोस्ट केला. मोदी यांच्या आधी सुद्ध अनेक महत्त्वाच्या मंडळींनी या त्याच्यासोबत या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर, हॉलिवूडचे कलाकार ज्युलिया रॉबर्ट आणि केट विन्सलेट यांचा सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!