Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा क्रांती सेनेची युतीकडे दहा जागांची मागणी , अन्यथा १०० जागा स्वबळावर लढणार

Spread the love

मराठा क्रांती सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीकडे १० जागांची मागणी केली असून या जागा न मिळाल्यास १०० जागा स्वबळावर लढणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

पुण्यात आज मराठा समन्वयक समितीची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत न जाता स्वबळावर १०० जागा निवडून आणून मराठा आरक्षण आंदोलनातून तयार झालेलं मराठा समाजाचं नेतृत्व विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शिवसेना-भाजपकडे दहा जागांची मागणी करण्याचा आणि या जागा युतीने न सोडल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी ४२ संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावाही मराठा क्रांती सेनेने केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!