Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Team Virat : विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची विराट सेना तयार , अनेक नवीन खेळाडूंना संधी

Spread the love

वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी-20, वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (रविवार) निवड करण्यात आली आहे. तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आज निवड समितिची बैठक झाली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता.

या बैठकीनंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी, खलिल अहमद, यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. माजी कर्णधार एमएस धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले होते, त्याच्याजागी  ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय व टी-२० संघातून विश्रांती देण्यात आली आहे. केवळ कसोटी संघात बुमराहला स्थान देण्यात आलंय, तर एकदिवसीय प्रकारात सातत्याने चांगला खेळ करणाऱ्या शिखर धवनला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळेल.

एकदिवसीय मालिकेसाठी संघ- 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी , भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी-20 मालिकेसाठी संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दिपक चहर, नवदिप सैनी

कसोटी मालिकेसाठी संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

भारत वि. वेस्टइंडीज- मालिकेचं वेळापत्रक –

पहिला टी-20 सामना : 3 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, फ्लोरिडा

दूसरा टी-20 सामना : 4 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, फ्लोरिडा

तीसरा टी-20 सामना : 6 ऑगस्ट 2019, रात्री 8:00, गुयाना

 

पहिली वनडे: 8 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7:00, गुयाना

दूसरी वनडे: 11 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7:00, त्रिनिदाद

तीसरी वनडे: 14 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7:00, त्रिनिदाद

 

पहिली कसोटी : 22-26 ऑगस्ट, संध्याकाळी 7:00, एंटिगुआ

दुसरी कसोटी: 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रात्री 8:00, जमैका

आपलं सरकार

Click to listen highlighted text!