Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sad News : मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त शिक्षकाचे अपघाती निधन , बुरखाधारी दुचाकीस्वार महिलेची धडक

Spread the love

मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त शिक्षकाला दुचाकीस्वार बुरखाधारी महिलेने धडक दिली. या अपघातात वृध्द शिक्षकाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास जालनारोडवरील सोनी हॉस्पीटलसमोर घडला. वसंत अण्णा निलख (५९, रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
गेल्या वीस वर्षांपासून दररोज सकाळी वसंत निलख दोन मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात होते. मंगळवारी सकाळी देखील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत तिघेही अ‍ॅपेक्स हॉस्पीटलसमोरुन पायी जात असताना एका बुरखाधारी दुचाकी (एमएच-२0-७९४६) स्वार महिलेने निलख यांना धडक दिली. हा अपघात घडताच दुचाकीस्वार महिलेने तेथून धुम ठोकली. यानंतर निलख यांना मित्रांनी तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डोक्याला पाठीमागे गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घाटीत धाव घेतली. निलख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
…….
पंधरा दिवसांपुर्वी झाले निवृत्त….
निलख हे कित्येक वर्षांपासून शिवाजीनगरातील मेहरसिंग नाईक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या ३0 जुन रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा अपघात नेमका कसा झाला यासाठी जिन्सी पोलिस परिसरातील सीसी टिव्ही कॅमेरांची तपासणी करणार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार हेमंत सुपेकर, सय्यद अतीक करत आहेत.

आकस्मात मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद – विटावा परिसरात एम.वाळूज पोलिसांना अकरा महिन्यापूर्वी सापडलेल्या मृतदेह प्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल मिळताच खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
भारत निवृत्ती अल्हाड(२७) रा. विटावा असे मयताचे नाव आहे. गेल्या आक्टोबर २०१८ मधे घाणेगाव नांदेडा रस्त्यावर भारत अल्हाड मृतावस्थेत आढळला होता. शरीरावर काही ठिकाणी जखमा होत्या.त्यावेळी या प्रकरणाची नोंद आकस्मात मृत्यू म्हणून झाली होती. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी मयत आल्हाड यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असा वैद्यकीय अहवाल एम.आय.डी.सी. वाळूज पोलिसांना मिळाला.त्यामुळे पी.एस.आय. विठ्ठल चासकर यांनी पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या आदेशावरुन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास सुरु केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!