Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : मंगळसूत्र चोरट्याकडून १ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त तर दुसऱ्या एका घटनेत ४८ किलो गांजा जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

गुन्हे शाखेची कारवाई

औरंंंगाबाद : सिडकोतील दोन महिलांचे मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राजेंद्र सुपडा चंडोल (वय २६, रा.जनुना,ता.जि.बुलढाणा) याच्याकडून गुन्हे शाखा पोलिसांनी चोरीचे ५ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोने, ४ मोबाईल, २ दुचाकी असा एवूâण १ लाख ९१ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राजेंद्र चंडोल हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी बुधवारी (दि.१७) वर्तवली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी पहाटे हडकोत घरासमोरी आंगण झाडत असलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र राजेंद्र चंडोल याने हिसकावून नेले होते. दरम्यान, हडकोतून महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा टीव्ही सेंटर भागात आला असल्याची माहिती १४ जुलै रोजी गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार संतोष सोनवणे, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, सरिता भोपळे, अनिल थोरे आदींच्या पथकाने टीव्ही सेंटर परिसरातून राजेंद्र चंडोल याला अटक केली होती.

Advertisements
Advertisements

दरम्यान, पोलिस चौकशीत राजेंद्र चंडोल याने विविध ठिकाणाहुन मंगळसूत्र व मोबाईल चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले होते. चंडोल याच्याविरूध्द सिडको-५, सिटीचौक-१, हर्सुल-१, पैठण-१ असे एवूâण ८ गुन्हे दाखल आहेत.

गांजाची तस्करी करणारे चौघे गजाआड, ४८ किलो गांजा जप्त : पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

गांजाची तस्करी करणा-या चार जणांना पोलिसांनी मंगळवारी (दि.१६) पहाटे सापळा रचून गजाआड केले. पोलिसांनी गाजांची तस्करी करणा-यांच्या ताब्यातून ४ लाख ६० हजार रूपये विंâमतीचा ४८ किेलो गांजा व व ३ लाख रूपये विंâमतीची एक कार असा एवूâण ७ लाख ६० हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलुमल्ली दुर्गाप्रसाद अप्पाराव (वय ३०, रा.तुर्ग गोदावरी, आंधप्रदेश), दुर्गेन रॉमेन लक्ष्मण (वय २२), कोसूरी सतीश पट्टराव (वय ३५), दोघे रा.राज कुलमंडी, आंध्रप्रदेश, केडमी राकेश अप्पाराव (वय १९, रा.नेसल्लीपट्टम, आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. हैदराबाद येथून पुण्याला दोन जण कारमधुन गांजा घेवून जात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके यांच्या पथकाने बीड बायपास रोडवरील झाल्टा फाटा अंबिका हॉटेल समोर सापळा रचला होता.खबNयाने दिलेल्या माहितीनुसार आलेली कार पोलिसांनी थांबवून कारची झडती घेतली असता, कारमध्ये ४८ किलो गांजा मिळून आला. गांजाची तस्करी करणाNया चौघांनी ११ पिशव्यामध्ये गांजा भरून तो कारच्या सिटखाली आणि डीक्कीमध्ये दडवून ठेवला होता. गांजाची तस्करी करणाNया चौघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह, सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!