Navi Mumbai : अनैतिक संबंधाच्या संशयातून “त्याने” पत्नीचा गळा चिरून बहिणीवरही केले वार !!

बहिणीच्या नवऱ्याबरोबर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर बहिणीच्या घरी जाऊन तिच्यावरही वार केले. आरोपीने आधी बहिणीबरोबर वाद घातला. त्यानंतर संतापाच्या भरात तिच्यावरही धारदार शस्त्राने वार केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. आरोपीच्या पत्नीला नेरुळच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.
नवी मुंबईतील नेरुळच्या सेक्टर २० मध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव नागेश आहे. नागेश गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून दोन महिलांवर हल्ला करुन तो फरार झाला आहे.