Aurangabad : गावठी कट्टा आणि सोनसाखळीसहित रेकाॅर्डवरील दोघे जेरबंद

औरंगाबाद – गावठी कट्टा आणि १लाख २० हजाराच्या सोनसाखळी सहित रेकाॅर्डवरील दोन चोरटे पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केले आहेत.
शेख जावेद शे.मकसूद उर्फ टिप्या (२८)रा.विजयनगर गारखेडा आणि आकाश चाटे अशी अटक आरोपींची नावे आहेत. शे.जावेद याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसे एन३ सिडको परिसरातून जप्त केले. जावेद विरुध्द मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलिसठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. २०१८ मधे जावेदला जिल्ह्यातूनहद्दपारही केले होते.तर आकाश चाटे रा. हनुमाननगर गारखेडा याच्याकडून ७ ग्रॅम सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
वरील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे, पीएसआय विकास खटके, जमादार रमेश सांगळे,पोलिस कर्मचारी बाळाराम चौरे, मच्छींद्र शेळके यांनी पार पाडली.