Aurangabad : फसवणूकीच्या गुन्ह्यात फिर्यादीने दिला चुकीचा पत्ता, पोलीस आयुक्तांची माहिती

औरंगाबाद – छावणी पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी वक्फ बोर्डा संबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीने आपला पत्ता चुकीचा दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांना मिळाली आहे.
या दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीने चुकीचा पत्ता दिला याबाबत आपण सखोल चौकशी करु असे प्रसाद म्हणाले.शहरातील वक्फ बोर्ड कार्यालयात बनावट नोंदणी केल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.यातील फिर्यादी यातील फिर्यादी आणि ७ आरोपी घाटकोपर मुंबई येथील आहेत. यातील फिर्यादी शमशाद हुसैन जाहिद हुसैन (५०) रा. मदिना मस्जीद मदरसा ट्रस्ट अकबलाल कंपाऊंड आझादनगर घाटकोपर पश्र्चिम असा आहे.तर आरोपी हाफिज उला खान, वलीउला मलिक, सय्यद उस्मान वाजिद व अन्य चार जण आहेत.रविवारी या पत्त्यावर फिर्यादी राहात नसल्याचे पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांना कळाले.या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.