Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatka Political Drama : कुमारस्वामी सरकार समोर मोठे आव्हान , ११ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

Spread the love

कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले कुमार स्वामी सरकार गडगडण्याचे संकेत मिळत असून पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारचे ११ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असून राजीनामा देण्यासाठी हे आमदार विधानसभेत पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलं. या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला काठावर बहुमत असेल, त्यामुळे कुमारस्वामी सरकार कधीही कोसळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे ८ आणि जेडीएसचे ३ आमदार असल्याचं सांगण्यात येतं. हे सर्व आमदार आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पोहोचले आहेत. या आमदारांनी त्यांचे मोबाइल फोन बंद ठेवल्याने काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांना या आमदारांशी संपर्क साधणं कठिण झालं आहे. त्यामुळे कर्नाटकात येत्या काही तासांत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

महेश कुम्थली- काँग्रेस , बी. सी. पाटील – काँग्रेस ,  रमेश जर्कीहोळी – काँग्रेस ,  शिवराम हेब्बर- काँग्रेस , प्रताप गौडा- काँग्रेस ,  सोमा शेखर- काँग्रेस ,  मुनीरत्ना- काँग्रेस ,  बिराथी बसवराज- काँग्रेस , रामालिंगा रेड्डी- काँग्रेस ,  एच. विश्वनाथ- जेडीएस , नारायण गौडा- जेडीएस ,  गोपालिया- जेडीएस

मागील  वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसचे ७० आणि जेडीएसचे ३५ आमदार निवडून आले होते. तर भाजपचे १०४ आमदार निवडून आले होते. मात्र बहुमतासाठीचा ११३चा आकडा भाजपला गाठता न आल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं होतं. तर काँग्रेसने मुख्यमंत्रीपद जेडीएसला देऊन राज्यातील सत्ता राखली होती. विद्यमान विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे मिळून एकूण ११६ आमदार असून त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने ही संख्या ११७ वर पोहोचली आहे. मात्र लोकसभा निवडणुका पार पडल्याने कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांची संख्या २०७ वर आणण्याचा भाजपचा प्लान आहे. ही संख्या घटल्यास भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षातील किमान १६ सदस्यांनी राजीनामा देणं आवश्यक आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!