Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी आनंद देणारी बातमी

Advertisements
Advertisements
Spread the love

स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी आनंद देणारी हि बातमी आहे . या बातमीनुसार आता तुम्हाला बँकेत पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर चार्जेस पडणार नाहीत. बँकेनं आरबीआयचा निर्णय अमलात आणलाय. या निर्णयानुसार बँकेने आता RTGS आणि NEFT चार्जेस काढून टाकलेत. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने  सामान्यांसाठी मोठी घोषणा केली होती. स्टेट बँकेने हा निर्णय १जुलै २०१९ पासून अमलात आणला आहे . या निर्णयानंतर इंटरनेट बँकिंग स्वस्त होतेय. आता RBI नं बँकांना हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवायला सांगितलंय. आता स्टेट बँकेतून  RTGS आणि NEFT करणे स्वस्त झाले आहे . आरबीआयने   RTGS आणि NEFT वर बँकाकडून आकारण्यात येणारे दर रद्द केले आहेत. RBI बँकांकडून हे दर घेत होती, पण आता ते घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फक्त बँक जे दर आकारेल तेच द्यावे लागतील.  म्हणजे RTGS आणि NEFT स्वस्त होतील.

Advertisements

RTGS (Real-time gross settlement) हे लाखो रुपये ट्रान्सफर करायचं उत्तम माध्यम आहे. या माध्यमात काही सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. याउलट एनईएफटी (National electronic funds transfer ) ठराविक वेळीच पैसे ट्रान्सफर होतात.याशिवाय आता सेंट्रल बँक आॅफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी कर्जावर कमी ईएमआयची खास भेट दिलीय. बँकेनं एमसीएलआर कमी केलंय. तुम्ही गृहकर्ज, आॅटो आणि पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असाल तर एक खुशखबर आहे. तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल तर तुमचा फायदा नक्की होईल. बँकेनं MCLR मध्ये वाढ केल्यानं त्याचा परिणाम ग्राहकांवर पडतोय. एप्रिल २०१६ नंतर ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना फायदा आहे. एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारा कर्ज देण्यासाठी कमीत कमी रेट बेस रेट होता. म्हणजे बँक याहून कमी दरावर ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हती. १ एप्रिल २०१६ पासून बँकिंग सिस्टिममध्ये MCLR लागू झाला. म्हणजे आता MCLRच्या आधारे कर्ज दिलं जाईल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!