Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gujrat : मॉब लिंचिंगच्या मोर्चाला हिंसक वळण , १४४ कलम लावून पोलिसांनी जमाव पांगवला

Spread the love

गुजरातमधील सूरत येथे असणाऱ्या नानपुरा भागात झुंडबळीविरोधात मुस्लीम समुदायाने मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागून सदर भागात कलम १४४ लागू करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या मोर्चासाठी प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. झुंडबळीविरोधात मोर्चा निघाल्याचे पाहून पोलिसांनी या आंदोलकांना हटकले. मात्र, त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये ४ ते ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर नानपुरा भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली. नानपुरा भागातील मोर्चाने हिंसक वळण घेतल्यानंतर आसपासच्या परिसरातही तणाव निर्माण झाला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाज सहभागी झाला होता. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रोखण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!