Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तिवरे धरणाच्या संदर्भात मंत्र्यांनी केलेल्या अजब वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात नेले खेकडे !!

Spread the love

राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अनोखं आंदोलन केलं. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चक्क खेकडे आरोपी म्हणून आणले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. असा जावई शोध करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची खोचक टीका आमदार आव्हाड यांनी केली आहे केली आहे. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले होते. या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमावेत नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे आरोपी म्हणून हजर केले. असे वक्तव्य मंत्री कसे काय करू शकतात, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतरही असे वक्तव्य करून या सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आव्हाड यांनी टीका केली आहे. खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच तिवरे धरण फुटले, असा असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते . या आधी पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचे अजब तर्क लावला होता.

तानाजी सावंत सोलापुरात बोलत होते, तानाजी सावंत, युवासेना नेते आदित्या ठाकरे जलसंपदा विभागाच्या आष्टी उपसासिंचन योजनेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. या वेळी सावंत यांनी हे अजब वक्तव्य केले. तिवरे धरण फुटले, त्याला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेनेच्या आमदाराने हे धरण बांधले आहे. याप्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली. निकृष्ट बांधकामाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!