Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह सापडले

Spread the love

चिपळूणमधील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून अद्याप १३ जणांचा शोध लागू शकलेला नाही. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध व मदतकार्य सुरू आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिवरे धरण फुटून हाहाकार माजला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सात गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले. या दुर्घटनेत तिवरेतील भेंडेवाडीला मोठा तडाखा बसला आहे. जे ग्रामस्थ बेपत्ता आहेत ते सर्व याच वाडीतील आहेत.

आतापर्यंत आत्माराम धोंडू चव्हाण (७५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५५), दशरथ रविंद चव्हाण (२०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धावडे (१८) यांच्यासह ११ जणांचे मृतदेह हाती लागले असून १३ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एका मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.घटनास्थळी एनडीआरएफ तसेच स्थानिक गावकऱ्यांकडून युद्धपातळीवर शोध व मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन थोड्यावेळापूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून ते घटनास्थळी भेट देवून स्थितीचा आढावा घेणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!