Dombivali : रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच झाली महिलेची प्रसूती …

डोंबिवली रेल्वे स्थानकात महिलेनं सकाळी गर्दीच्या वेळी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. जासमिन शेख असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव असून जासमिन या खडवलीच्या रहिवासी आहेत.
प्रसूती वेदना सुरू झाल्यानं जासमिन शेख या आज सकाळी मुंबईच्या कामा हॉस्पिटलला जायला निघाल्या. मात्र डोंबिवली स्थानक येताच त्यांना कळा असह्य होऊ लागल्या. त्यामुळे त्या गाडीतून उतरल्या आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरच त्यांची प्रसूती झाली.
रेल्वे स्थानकावर असलेल्या महिला रेल्वे प्रवाशांनी यावेळी जासमिनची मदत केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला तातडीनं डोंबिवलीतल्या केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं. जासमिनने गोंडस मुलाला जन्म दिला असून हे दोघेही सुखरूप आहेत.