बीड जिल्ह्यातील मातेला झाले “तिळे” , डॉ. मिताली गोलेच्छा यांनी यशस्वी केली अवघड शस्त्रक्रिया

बीड जिल्ह्यात एका मातेने तिळ्यांना जन्म दिला असून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती विभागात डॉ. मिताली गोलेच्छा यांनी हि अवघड शस्त्रक्रिया करण्यात यश मिळवल आहे. या शस्त्रक्रियेत तीळ्यांना जन्मदेत तीन्ही बालकांचे व मातेचे प्राण वाचवण्यात डॉक्टराना यश आले आहे . गर्भवती महिलेच्या सोनाग्राफीत जुळी मुलं दाखविण्यात आली होती. मात्र तीन मुलं झाल्याने डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलंय.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसुती विभागात २४ जुन रोजी रात्री एक महिला तीव्र प्रसव वेदनेने प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेची तपासणी केली असता त्यांना तीळ्याचा संशय आला. त्यांनी यापुर्वीच्या तपासणीची माहिती विचारली असता या महिलेने गर्भधारणेनेनंतर खाजगी रुग्णालयात केलेल्या तीन सोनोग्राफी मध्ये सदरील महीलेला जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. त्यातच अशा प्रकराच्या प्रसुती या थोड्या अवघड असल्याने अतिशय काळजीपूर्वक अशा केसेस हाताळाव्या लागतात असं मत डॉ. मिताली गोलेच्छा यांनी व्यक्त केलं. तिघांचीही प्रकृती चांगली असल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलंय. सध्या या बाळा मधील एक मुलगी २ किलो वजनाची सुखरूप असून १.५ किलो वजनाच्या दोन मुलांवर कमी वजन असल्याने उपचार सुरू आहेत.