Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमदारांची बॅग पाळविणाऱ्या चोरटा पकडण्यात कल्याण पोलिसांना यश

Spread the love

रेल्वेच्या राखीव डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या बुलढाणाच्या दोन आमदारांच्या बॅग चोरी प्रकरणी पोलिसांनी अहमद हबीबी अली सय्यद (वय २८ वर्षे, रा. कल्याण) याला अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारेच लोहमार्ग पोलिसांनी त्याला ४८ तासात अटक करण्यात यश मिळविले आहे. त्याच्याकडून ५१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हे सोमवारी मुंबईत विधीमंडळ अधिवेशनासाठी येत असतानाच कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार होता. आमदार बोंद्रे यांनी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेस पकडली. त्यांच्यासोबत पत्नी वृषाली बोंद्रे या सुद्धा होत्या. पहाटे ६ वाजता एक्सप्रेस, कल्याण रेल्वे स्थानक येथे थांबली. त्याचवेळी एक चोरटा त्यांच्या बर्थमध्ये शिरला. पर्समधील २६ हजार रूपये, मोबाईल व रोख २४ हजार रूपयांसह पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असलेली पर्स घेऊन चोराने चालत्या गाडीतून फलाटावर उडी मारून पळ काढला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष कृती दल भायखळा, कल्याण युनिट, कल्याण रेल्वे पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी फिर्यादीने दिलेल्या वर्णनाचा व्यक्ती हा अहमद हबीबअली सय्यद असल्याची खात्री पोलिसांना झाली. सय्यद हा कल्याण पूर्वेतील दत्तमंदिर झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेालिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो नाशिक येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी काशी एक्सप्रेसने रात्री ८च्या सुमारास सय्यद कल्याणाला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेालिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!