Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनमोहनसिंग सरकारच्या आदेशानुसार मिळालेल्या माहितीनुसार काळा पैसा होता तरी किती ? संसदीय समितीने जाहीर केले आकडे !!

Spread the love

देशाचे सहावे पंतप्रधान चरणसिंग यांच्या कार्यकाळापासून म्हणजेच १९८० सालापासून ते मनमोहनसिंग यांच्या काळापर्यंत २०१० पर्यंतच्या ३० वर्षांच्या कालावधीत २४६.४८ अब्ज डॉलर (१७,२५,३०० कोटी रुपये) ते ४९० अब्ज डॉलर (३४,३०,००० कोटी रुपये) एवढा काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन बड्या संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात सदर माहिती देण्यात आली आहे. काळ्या पैशावरून राजकारण तापल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च २०११ मध्ये मनमोहनसिंग  सरकारने या तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा शोध घेण्याचे काम सोपवले होते. २०१० नंतर  अद्याप मोदीसरकारच्या काळात मात्र काळा पैसा शोधण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी आजघडीला २०१० नंतर नेमका किती  पैसा आहे याचा एकदा जाहीर करण्यात आलेला नाही हे विशेष .

आर्थिक व्यवहारांच्या स्थायी समितीने सोमवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार  बांधकाम, खाण, औषधे, पान मसाला, गुटखा, तंबाखू, व्यापारी माल, सोने-चांदी, चित्रपट आणि शिक्षण अशा क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा असल्याचा निष्कर्ष या तीन संस्थानी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे.

काळा पैशाच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा कोणताही अंदाज बांधू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या तर्कावरून काळ्या पैशाबाबतची ठोस कार्यपद्धती सांगितली जाऊ शकत नाही. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहेत, असे ‘देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशाची सद्यस्थिती आणि त्याचे विश्लेषण’ नामक अहवालात मांडण्यात आले आहे. या अहवालात मांडण्यात आलेले अंदाज कोणत्याही एका प्रकारच्या तपास पद्धतीने समोर आलेले नाहीत. त्याचप्रमाणे यातील तपास पद्धती आणि दृष्टिकोन याविषयी एकमतही नाही, असेही यात म्हटले आहे.

नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) यांच्या अहवालानुसार १९८० ते २०१० या तीस वर्षांमध्ये भारतीयांनी परदेशात सुमारे २६,८८,००० लाख कोटींपासून ते ३४,३०,००० कोटी रुपये पाठवले. तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाइनॅन्शल मॅनेजमेंट (एनआयएफएम) या संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, १९९० ते २००८ या कालावधीत १५,१५,३०० कोटी रुपये भारतीयांनी परदेशात पाठवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अॅण्ड फाइनान्स (एनआयपीएफपी) या संस्थेच्या मते, १९९७-२००९ या कालावधीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ०.२ ते ७.४ टक्के काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!