Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्या मिशा राष्ट्रीय मिशा घोषित करण्याची काँग्रेस खासदाराची लोकसभेत मागणी

Spread the love

पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडेलल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्या मिशा राष्ट्रीय मिशा घोषित करण्यात याव्या अशी अजब मागणी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. तसंच त्याचा यथोचित सत्कार करण्यात यावा असं मतही त्यांनी संसदेत व्यक्त केलं आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे ४९ जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारतीय सीमेत घुसली होती. भारतीय वायूदलाने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर मात्र ती पाकिस्तानात पळून गेली. यापैकी एका विमानाचा पाठलाग करत अभिनंदन वर्धमानपाकिस्तानी सीमेत शिरला आणि पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडला. अभिनंदनच्या सुटका करा अशी मागणी जोर धरू लागली. अखेर आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान याची सुटका केली. शेवटपर्यंत पाकिस्तानच्या विमानाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या अभिनंदनचा यथोचित सत्कार करण्यात यावा अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली. तसंच त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मिशांचे कौतुकही त्यांनी केले. त्याच्या सन्मानार्थ या मिशा राष्ट्रीय मिशा जाहीर करण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!