Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्येच आहे काँग्रेसमध्ये नाही : असदुद्दीन ओवेसी

Advertisements
Advertisements
Spread the love

अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे. वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय झाला कारण त्याठिकाणी ४० टक्के मुस्लिम मतदार आहेत. देशात मुस्लिमांसाठी जागा हवी पण मुस्लिम समाजाला कोणाची भीक नको अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

Advertisements

तेलंगणा येथे खासदार ओवेसी यांनी जनसभेला संबोधित करताना सांगितले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या दिवशी भारत स्वातंत्र झाला त्यावेळी आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. हा भारत गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यावधी लोकांचा असेल. मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत असं ओवेसी यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

काँग्रेसला ताकद, विचार आणि कठोर मेहनत घेण्याची इच्छा नाही. देशभरात भाजपा कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा हरली आहे. भाजपाला काँग्रेसने हरवलं नाही अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमेठीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!