काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा कंठस्नान , मोठा शस्त्रसाठाही जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा भागात गुरुवारी संध्याकाळी शोधमोहीम राबवली जात असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शुक्रवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे.यापूर्वी शोपियन जिल्ह्यातील मोलू-चित्रगाम भागात ३ जून रोजी चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. तर शोपियन जिल्ह्यातच ३१ मे रोजी झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार झाले होते तर एक जवान जखमी झाला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!