Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rahul Gandhi : राहुल गांधी आणि गांधी घराण्याला पर्याय आला , काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास “या” नेत्यांची आहे तयारी !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, एका नेत्याने त्यांच्याकडे आपल्याला पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ऑलंपिक पदक विजेते हॉकीपटू अस्लम शेरखान यांनी राहुल गांधींना एक पत्र लिहून ही इच्छा व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी म्हटले की, काँग्रेसचा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी हे पत्र लिहिले आहे. तसेच जेव्हा राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कोणाला तरी अध्यक्षपद देण्याचा विचार त्यांनी मांडला तेव्हा मला वाटले की माझ्यासाठी ही एक संधी आहे.

अस्लम यांनी म्हटले की, काँग्रेसला यावेळी धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी कोणाला तरी पुढे यावे लागेल. यासाठीच मी राहुल गांधींना पत्र लिहून आपली भावना व्यक्त केली. मी त्यांना म्हटले की, जर तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहू इच्छित असाल तर कायम राहू शकता. मात्र, जर तुम्हाला हे पद सोडायचे असेल तर तुमच्या निर्णयाचाही सन्मान व्हायला हवा. तुम्हाला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील कोणी व्यक्ती हवी असेल तर मला एक संधी द्या, कारण यासाठी दुसरा कोणीही पुढे येत नाहीए. मला दोन वर्षांसाठी ही संधी देण्यात यावी. काँग्रेसला राष्ट्रवादाशी पुन्हा जोडणे गरजेचे आहे, असेही त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखील लोकसभा निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागल्यानंतर त्याची नैतीक जबाबदारी स्विकारुन राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला. मात्र, काँग्रेसच्या कार्यकारिणीने त्यांचा हा निर्णय स्विकारलेला नाही. मात्र, राहुल गांधी आपल्या निर्णयावर अद्यापही ठाम आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!