Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या शौचालयांमध्ये गांधी आणि राष्ट्रध्वजातील अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स

Spread the love

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथल्या शौचालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रध्वजातील अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही शौचालये बांधण्यात आली आहेत.

बुलंदशहरमधील इच्छावरी गावात हा प्रकार घडला असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. एका आठवड्यापूर्वी शौचालयांमध्ये या टाईल्स बसवण्यात आल्या होत्या. सोमवारी ही बाब ग्रामस्थांना प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

इच्छावरी गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे ५०८ शौचालये बांधण्यात आली आहेत. यांपैकी १३ शौचालयांमध्ये महात्मा गांधी आणि अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत त्या टाईल्स काढून टाकल्या. हे प्रकरण समोर आल्यानंतर बुलंदशहर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करीत ग्रामविकास अधिकारी संतोष कुमार यांना निलंबित केले असून गावच्या सरपंच सावित्री देवी यांच्या संयुक्त ग्रामनिधी खात्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ब्लॉक अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे जिल्हा पंचायत राज अधिकारी अमरजीत सिंग यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!