Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Income Tax : फॉर्म 16 मध्ये बदल, द्यावी लागणार अधिकची माहिती

Spread the love

आर्थिक वर्ष 2019-20मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2019 करण्यात आली आहे. परंतु या वर्षी रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढण्याची शक्यता आहे. कारण प्रत्यक्ष कर निर्धारण बोर्डा (सीबीडीटी)नं फॉर्म 16 जारी करण्याच्या शेवटच्या तारखेच्या मुदतीत वाढ केली आहे. तसेच वित्त वर्ष 2018-19मध्ये फॉर्म 24Q भरण्याची शेवटची मुदतही वाढवण्यात आली आहे.

फॉर्म 16मध्येही बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार कर्मचाऱ्यांसंदर्भात अधिक माहिती द्यावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागानं 2018-19मध्ये फॉर्म 16 जारी करण्याची मुदत कंपन्यांना वाढवून दिली आहे. त्यात 25 दिवसांची वाढ करून ती मुदत 10 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे आता 10 जुलैपर्यंत कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करता येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!