Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सैराट फेम आर्ची , रिंकू राजगुरूच्या बारावीच्या निकालाचे काय झाले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ‘सैराट’ या चित्रपटामुळे नावारुपाला आलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील यंदा बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत रिंकू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूने टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून १२ वीची परीक्षा दिली होती.

Advertisements

रिंकू नियमित कॉलेजला जात नसल्याने तिने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षा दिली होती. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती. यावेळी तिचे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान, रिंकू परीक्षा देत असताना परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!