Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राच्या बारावी बोर्डाचा निकाल उद्या २८ ला

Spread the love

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल. मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे –
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in

एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल
Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!