सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या कुटुंबातील सहाजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश , तिघांचा मृत्यू

जाधववाडी धरण परिसरात सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या कुटुंबातील सहाजण बुडाले. यापैकी तिघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. तर तिघांनाच बुडून मृत्यू झाला. रविवारी (१९ मे) दुपारी ही घटना घडली. एनडीआरएफकडून याच भागात काम सुरू असताना ही घटना जाधववाडी धरण परिसरात सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या कुटुंबातील सहाजण बुडाले. यापैकी तिघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. तर तिघांनाच बुडून मृत्यू झाला. रविवारी (१९ मे) दुपारी ही घटना घडली. एनडीआरएफकडून याच भागात काम सुरू असताना ही घटना घडल्याने सहाजणांपैकी तिघांचा जीव वाचला. अनिल कोंडीबा कोळसे (५८, रा. घाटकोपर, मुंबई), प्रितेश रघुनाथ आगळे (३२), प्रशिल आढाव (८, रा. वाशी, मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, दादासाहेब गायकवाड (४३, रा. येलवाडी, ता. खेड) यासह त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड, मुलगी उत्कर्षा गायकवाड एनडीआरएफच्या मदतीमुळे बचावले आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्टीनिमित्त दादासाहेब गायकवाड यांच्या घरी पाहुणे आले आहेत. त्यात आज रविवार असल्याने सर्वांनी जाधववाडी येथील धरणात फिरायला जाण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे दादासाहेब गायकवाड त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड, मुलगी उत्कर्षा गायकवाड, बहीण छाया कोळसे व तिचे पती अनिल कोळसे, भाची स्मिता आढाव, तिचा मुलगा प्रशिल आढाव, जावई रितेश आगळे असे सर्वजण मारुती अल्टो कार आणि रिक्षामधून जाधववाडी धरण परिसरात गेले होते.
धरणामध्ये एनडीआरएफच्या जवानांचा कॅम्प सुरू आहे. त्यामुळे सर्वजण कॅम्पपासून थोड्या अंतरावर खेळण्यासाठी गेले. सर्वजण धरणाच्या काठावर बसले असता अनिल कोळसे यांचा पाय घसरला आणि ते धरणात बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांनी हात दिला.अनिल यांना पकडत असताना धक्का लागून स्मिता आणि प्रशिल हेदेखील पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी जावई प्रितेश हे पाण्यात आले. मात्र, प्रितेश कुणालाही वाचवू शकले नाहीत. किंबहुना तेही बुडू लागले. यामुळे संगीता आणि त्यांची मुलगी उत्कर्षा या दोघी सर्वांना वाचविण्यासाठी पाण्याकडे धावल्या.
दरम्यान, धरण परिसरात मोठा गोंधळ झाला. या घटनेची माहिती एनडीआरएफच्या जवानांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सर्वांना पाण्यातून बाहेर काढले. प्रशिल आढाव, अनिल कोळसे, दादासाहेब गायकवाड आणि प्रितेश आगळे या सर्वाना तात्काळ उपचारासाठी तळेगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण बचावले.