मोदी आणि त्यांच्या टोळीपुढे निवडणूक आयोगाचे लोटांगण, राहुल गांधी यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसोबतच निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोग मोदी सरकारला घाबरून काम करतं, असा आरोप राहुल यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. ते लिहितात, ‘ईव्हीएम, निवडणूक कार्यक्रमाशी छेडछाड, नमो टीव्ही, केदारनाथ ड्रामा अशा सर्वच बाबतीत निवडणूक आयोगाने मोदी आणि त्यांच्या टोळीपुढे लोटांगण घातलेले भारतीयांनी पाहिले आहे. निवडणूक आयोगाचं काम केवळ घाबरणं, मान देणं आहे आणखी काही नाही.’