ठाण्यात सेफ्टी टॅंक साफ करणा-या तीन सफाई कामगारांचा मृत्यू , ५ जण बचावले

ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया परिसरात सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी उतरलेले आठ कामगार गुदमरल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे. त्यातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे.
ढोकळी नाका येथे प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरियामध्ये १३० घनमीटरचा एसटीपी प्रकल्प आहे. तेथील सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी उतरलेले आठ कामगार गुदमरले. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला. अमित पहाल, अमन बादल, अजय बुंबक अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.