Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : महाराष्ट्रात ५५.७८ % मतदान , विदर्भातील उन्हाचा मतदानाला फटका आणि उदासीन मतदार …

Spread the love

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या 20 राज्यांमध्ये 91 मतदारसंघांमध्ये आज  मतदान प्रक्रिया पूर्ण झाली . महाराष्ट्रात विदर्भातल्या सात जागांवर आज मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती देण्या आली आहे. विदर्भातील उन्हाचा मतदानाला फटका तर बसलाच पण मतदारांची उदासीनताही मोठ्या प्रमाणात दिसून आली .  सकाळी आणि दुपारनंतरच  खऱ्या अर्थाने मतदान झाले . एकूण लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी शांततेत मतदान पार पडले. ९१ मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे माहिती निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी दिलीआहे.

विदर्भातीलल्या 7 मतदारसंघात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह संवेदनशील गडचिरोलीचाही यामध्ये समावेश आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये नेहमीप्रमाणे 3 वाजेपर्यंतच मतदान संपवण्यात आलं. तर तिकडे जम्मू आणि काश्मीरमधील 2 जागांसाठीही मतदान पार पडलं. मतदानासाठी खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान जखमी झालेत. तर मतदान संपल्यावरही सुरक्षा पथकावर माओवाद्यांनी गोळीबार केला.

सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती .

91 लोकसभा जागांसाठी मतदान पूर्ण, दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद.

महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.७८ टक्के मतदानाची नोंद

१. वर्धा : 55.36 %

2. रामटेक  : 51.72 %

3. नागपूर  : 53.13 %

4. भंडारा -गोंदिया  : 60.50%

5. गडचिरोली -चिमूर  : 61.33 %

6. चंद्रपूर  : 55.97 %

7. यवतमाळ -वाशीम  : 53.97 %

इतर राज्यातील मतदान

१. बिहार : 50.26%
२. तेलंगणा : 60.57%
३. मेघालय : 62%
४. उत्तर प्रदेश : 59.77%
५. मणिपूर r: 78.20%
६.लक्षद्वीप : 65.9%
७. आसाम : 68%

ठळक घटना …

 चंद्रपूर जिल्ह्यातील चिखलगाव-लाडजवासीयांचा मतदानावर बहिष्कार

गडचिरोली : मतदान संपल्यानंतर मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, तीन जवान जखमी

आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रात राडा

शामली जिल्ह्यातील एका मतदान केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्याऱ्या लोकांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी केला हवेत गोळीबार.

दंतेवाडामध्ये कडोकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान

आंध्र प्रदेशातील जनसेनाचे उमेदवार मधुसुदन गुप्तान यांनी ईव्हीएम तोडली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ओडिशा : मलकांगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडामध्ये नक्षलवाद्यांच्या धमकीमुळे ६ मतदान केंद्रांवर एकही मतदान झाले नाही

राज्याच्या उपराजधानीत आणि मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरात आज देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला.  केंद्रीय मंत्री आणि नागपुरातले युतीचे उमेदवार नितीन गडकरींनीही मतदान केलं. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच नागपुरातल्या धरमपेठ मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता आणि आईही सोबत होत्या.

१५ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन झाल्या नादुरुस्त. त्यात  6 घटना आंध्रप्रदेश , 5 अरुणाचल प्रदेश , 1बिहार , 2 मणिपूर  आणि एक पश्चिम बंगाल : निवडणूकअयोग्य

आपलं सरकार

Click to listen highlighted text!