Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवृत्त न्यायाधीश सी. एस. कर्णन वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याच्या तयारीत

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून  निवृत्त न्यायाधीश सी. एस. कर्णन मैदानात उतरणार  असल्याचे वृत्त आयएएनएसने दिले आहे .  निवृत्त न्यायाधीश सी. एस. कर्णन मद्रास आणि कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश होते.

आपल्या उमेद्वारी संदर्भात बोलताना न्या . सी. एस. कर्णन यांनी  सांगितले की, ‘मी नरेंद्र मोदींच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सध्या या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचे काम सुरु आहे.’ विशेष म्हणजे, सी. एस. कर्णन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आधीच केरळमधील मध्य चेन्नई मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सी. एस. कर्णन यांनी 2018 मध्ये अँटी-करप्शन डायनॉमिक पार्टीची (ACDP) स्थापना केली आहे. या पार्टीचे उमेदवार म्हणून सी. एस. कर्णन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सी. एस. कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी सरन्यायाधीश जे. ए. खेहर यांच्यासह न्यायालयीन व्यवस्थाबाबत बंड पुकारले होते. याप्रकरणी न्यायव्यवस्थेचा अवमान केला असल्याचा आरोप ठेवत सर्वोच्च न्यायालयाने  सी. एस. कर्णन यांना ही शिक्षा ठोठावली होती. न्यायधीश म्हणून कार्यरत असताना अशाप्रकारे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले सी. एस. कर्णन हे देशातील पहिलेच न्यायाधीश आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!